बंगाली जनतेने ‘क्रूर महिलेला’ पुन्हा सत्तेत आणून ‘ऐतिहासिक चूक’ केली : भाजप नेत्याचं वक्तव्य

पश्चिम बंगालमध्ये भाजपला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने धुव्वा उडवला आणि बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर भाजपाच्या विरोधकांसह पंतप्रधान मोदींनी व भाजपाच्या काही नेत्यांनीही विजयाबद्दल ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या आहेत.

पण, पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर क्रूर महिलेला पुन्हा सत्तेवर आणून पश्चिम बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक चूक केल्याची टीकाही सुप्रियो यांनी केली.

बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. “मी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देणार नाही किंवा मी जनादेशाचा आदर करतो असंही म्हणणार नाही…भाजपाला संधी न देऊन बंगालच्या जनतेने भ्रष्ट, असमर्थ, अप्रामाणिक सरकार आणि एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली आहे”, अशी पोस्ट सुप्रियो यांनी केली.

“कायद्याचं पालन करणारा नागरीक म्हणून एका लोकशाही असलेल्या देशातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाचे मी पालन करेन”, असंही सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं. थोड्याचवेळात या पोस्टवरुन टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर मात्र त्यांनी ही फेसबुक पोस्ट डिलिट केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.