बंगालची ‘वाघीण’ ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. ममता बॅनर्जी या आज सकाळी 10.45 वाजता राजभवनात शपथ घेणार आहेत. राजभवनात हा कार्यक्रम साधेपणाने केला जाणार आहे. शपथ ग्रहणाचा हा कार्य़क्रम 55 मिनिटांचा असणार आहे. यानंतर ममता थेट नबन्नायेथे जाार आहेत.

तिथे ममतांना गार्ड ऑफ ऑनर दिले जाईल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 213 जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. भाजपाने 77 जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा राहणार आहे. बंगाल विधानसभा निकालानंतर हिसाचार उफाळला होता. याविरोधात भाजपने कठोर भूमिका घेतली आहे .

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत.कोरोना महामारी पाहता ममता बॅनर्जी यांनी शपथ समारंभाला 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आमि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.