बहुउपयोगी जांभूळ खा,मधुमेहापासून रहा दूर

टीम महाराष्ट्र देशा : जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या,तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे . जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते.
जांभूळ खाण्याचे फायदे

  • जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं.
  • जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अनिमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती       वाढते.
  • जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं हदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं. जांभूळ         खाल्ल्यानं हदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.
  • जांभूळ नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असतं. त्यामुळे जांभूळ         खाल्ल्यानेही  रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं.
  • जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं     आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  • जांभूळ थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.

आरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.