InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार

- Advertisement -

 दिल्लीच्या शास्त्री भवन येथे आज ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मराठीसह अन्य भाषांमधील चित्रपटांनाही पुरस्कार यावेळी जाहीर झाले.

तत्पूर्वी पुरस्कार निवड समितीमधील सदस्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अंतिम निकालाची यादी सुपूर्द केली.

- Advertisement -

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे:

  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन) – सुधाकर  रेड्डी यंकट्टी (नाल)
  •  सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
  • सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट- पद्मन
  •  सर्वोत्कृष्ट चित्रपट (पर्यावरण संवर्धन)- पाणी
  •  सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरित)- अंदाधून
  •  सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) – ची ला सो
  •  सर्वोत्कृष्ट संवाद- तारीख (बंगाली)
  •  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
  •  सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे, पी.व्ही. रोहित, साहिब सिंग, तल्हा अर्शद रेशी
  •  सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग- उरी
  •  सर्वोत्कृष्ट संकलन- नतिचरामी (कानडी)
  •  सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनिंग- कामरा संभवम (मल्याळम)
  •  सर्वोत्कृष्ट वेशभुषा- महंती (तेलुगू)
  •  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरजित सिंग (बिंते दिल)
  •  सर्वोत्कृष्ट लघुपट- खरवस
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- हेलारो (गुजराती)
  •  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंदाधून
  •  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
  •  सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुषमान खुराना (अंदाधून), विकी कौशल (उरी)
  •  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्थी सुरेश (महंती)
  •  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा- आव (तेलुगू)
  •  सर्वोत्कृष्ट संगीतकार- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
  •  सर्वोत्कृष्ट गीतकार- नतिचरामी (कानडी)
  •  सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस- आव (तेलुगू) केजीएफ (कानडी)
  •  सर्वोत्कृष्ट साहसी दृश्य- केजीएफ

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.