Best Mileage Car | 2022 मधील ‘या’ आहेत सर्वोत्कृष्ट मायलेज देणाऱ्या कार
Best Mileage Car | टीम महाराष्ट्र देशा: देशात गेल्या काही काळापासून कार विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत कार उत्पादक कंपनी त्यांचे नवनवीन कार मॉडेल बाजारात लाँच करत असते. या वाढत्या कारच्या विक्रीमुळे कार उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांना बेस्ट फीचर सोबतच बेस्ट मायलेज देण्याचा प्रयत्न करत असतात. कारण कार खरेदी करत असताना ग्राहक नेहमी सर्वोत्तम मायलेज असलेली कार खरेदी करतो. कारण वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोक आता जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांना महत्त्व देऊ लागले आहेत. 2022 मध्ये पुढील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या गाड्या लाँच झाल्या आहेत.
2022 मधील ‘या’ आहेत सर्वोत्कृष्ट मायलेज (Best Mileage Car) देणाऱ्या कार
सुझुकी वॅगन आर
सुझुकी वॅगन आर या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आणि 1.2L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. या गाडीतील पहिले इंजिन 25.19kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर, दुसरे इंजिन 24.43kmpl मायलेज देऊ शकते. या कारचे CNG व्हेरीयंट 34.04 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख ते 7.08 लाख रुपयांपर्यंत आहे.
मारुती सुझुकी सेलेरिया
मारुतीची मारुती सुझुकी सेलेरिया सेकंड जनरेशन ही देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कार पैकी एक आहे. या कारचे VXi AMT व्हेरियंट सर्वाधिक म्हणजेच 26.68kmpl मायलेज देते. त्याचबरोबर या कारचे ZXi आणि ZXi+AMT हे प्रकार 26kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतात. या कारची एक्स-शोरुम किंमत 5.15 लाख ते 6.94 लाख रुपयांपर्यंत आहे.
सुझुकी डिजायर
सुझुकी डिजायर या कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. ही कार AMT प्रकारामध्ये 24.12kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. त्याचबरोबर या कारचे मॅन्युअल व्हेरियंट 23.26kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 6.24 लाख ते 9.18 लाख रुपयांपर्यंत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Skin Care Tips | ‘या’ गोष्टींचा वापर करून चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने घ्या काळजी
- Rishabh Pant | दिल्लीत ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, डोक्याला झाली गंभीर दुखापत
- PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
- Ajit Pawar | TET घोटाळा आमच्या काळात झाला असले तरी चौकशी करा – अजित पवार
- Winter Session 2022 | बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश होणार ; विधानसभेत मोठा निर्णय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.