टेन्शन फ्री व्हायचंय… तर चला मग पवना लेक कॅम्पिंगला

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आयुष्याचा आनंद घ्यायलाच कुठेतरी विसरत चाललोय. घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर असा आपला दिनक्रम. मग सुट्टीच्या दिवशी तरी किमान आपल्याला आयुष्याचा आनंद लुटता यायला हवा ना!, पुण्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये सुट्टी म्हणल कि केवळ पिक्चर बघन किंव्हा मॉलमधील शॉपिंग हेच होवून जाते. पण आता तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात मोकळी आणि फ्रेशनेस देणारी हवा, अंधाऱ्या रात्री आल्हाददायक वाटणारी चंद्र ताऱ्यांची साथ.. सोबतीला रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज अनुभवायचा असेल तर पवना लेक आऊटिंग कॅम्पनिंगला जायलाच हव…

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सह्यादीच्या पर्वतरांगामध्ये असणारे पवना डॅम हे सध्या पर्यटकांना साद घालत आहेत. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर वडगाव मावळ सोडल्यानंतर कामशेत गाव लागते. तेथून डावीकडे वळण घेत १५ किलोमीटर अंतरावर येते ते पवनानगर आणि इथेच आहे सुंदर दिसणारे पवना डॅम. पवना डॅमच्या चारही बाजूला डोंगर रांगा आहेत.

पवना डॅमला गेल्यानंतर राहण्याचे सुंदर ठिकाण म्हणजे ‘पवना लेक आऊटिंग कॅम्पिंग’. बरोबर डॅमच्या बाजूला असलेल्या पवना लेक आऊटिंग कॅम्पिंगमध्ये राहण्यासाठी खास अशा टेंट हाउसची सुविधा आहे. राहण्या सोबतच पवना लेक कॅम्पिंग मध्ये तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पवना डॅममध्ये बोटिंग, रात्रीच्या वेळी कॅम्प फायर, लहान मुलांसाठी आकर्षक गेम्स या सुविधा उपलब्ध आहेत.

जेवणासाठी खास असे चुलीवरचे गावरान ठसकेबाज व्हेज –नॉनव्हेज जेवण, कँडल लाईट डिनर, झणझणीत झुणका भाकरी, असा मेन्यू उपलब्ध आहे. आता एवढ केवळ वाचण्यासाठीच नाही तर प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लगेच कॉल करा 7083512250 या नंबरवर.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.