Bhagat Singh Koshyari | सीमावादात राज्यपाल कोश्यारींची मध्यस्थी, अमरावतीत महत्वाची बैठक

Bhagat Singh Koshyari | अमरावती : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावरती जिल्ह्यांबाबत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी  दोन्ही राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांची संयुक्त बैठक अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सुरू झाली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आंदोलन होण्याची शक्यता असल्याने ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर महाराष्ट्रातील भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी, शिंदवाडा, बैतुल, बुरानपुर,खंडवा, हारगोन, बडवाणी आणि अलीराजपूर या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे.

यापैकी महाराष्ट्रातील नागपूर अमरावती बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातून थेट मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नियमित वाहतूक होते. अमरावती जिल्ह्यातून बैतूल खंडोबा बऱ्हाणपूर शिंदवाडा या जिल्ह्याचा दळणवळण होत असते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.