Bhagatsigh Koshyari | “मला राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा”; भगत सिंह कोश्यारी देणार राजीनामा

Bhagatsigh Koshyari | नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे त्यांनी मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही” असे कोश्यारी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत “मी राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो”, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल सतत अवमानकारक वक्तव्ये आणि राज्यपाल पदाचा गैरवापर केल्याचा आरोप भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सातत्याने झाला आहे. राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीने लावून धरली आहे. आता राज्यपालांनीच स्वेच्छेने राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.