Bhagatsingh Koshyari | “गडकरी तर रोडकरी, शरद पवार साखरेपेक्षाही गोड”; भगतसिंह कोश्यारींचं मिश्किल वक्तव्य
Bhagatsingh Koshyari | औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
ते म्हणाले, “मी आता मंचावर बसलो होतो, तेव्हा मी शरद पवारांना विचारलं की, तुम्ही प्राथमिक शिक्षण कुठून घेतलं? तेव्हा मला कळालं तेही माझ्यासारखं जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकले आहेत. आम्हाला पाचवीपर्यंत ‘एबीसीडी’बाबत काहीही माहीत नव्हतं. पण शरद पवारांनी महाराष्ट्रात शेती, ऊस आणि साखर उद्योगात अभूतपूर्व काम केलं आहे. त्यामुळे त्यांना कधी-कधी राग आला तरी ते साखरेपेक्षा गोड राहतात” असं मिश्किल वक्तव्य कोश्यारी यांनी केलंय.
शरद पवार एक वेगळं रसायन आहे. त्यांना कितीही राग आला तरी ते साखरेपेक्षा गोड राहतात. लोकांशी प्रेमानेच वागतात, तर गडकरी यांनी रस्ते विकासात एवढं काम केलंय की लोक त्यांना आता गडकरी ऐवजी ‘रोडकरी’ म्हणतात, असं कोश्यारी म्हणालेत. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली आहे. यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
काय म्हणालेत भगतसिंह कोश्यारी?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे
महत्वाच्या बातम्या :
- IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सामन्यांमध्ये विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू
- Ramdas Athawale | “राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं”; रामदास आठवलेंचा खोचक सल्ला
- Sambhaji Chhatrapati | “राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा”; कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी छत्रपती संतापले
- Urfi Javed | उर्फीची अतरंगी फॅशन! कापडाचा सोडून मोबाईलचा बनवला ड्रेस
- Bhagatsingh Koshyari । “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श, मी नव्या युगाविषयी…”; भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्यं पुन्हा चर्चेत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.