Bhagatsingh Koshyari | “मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही”; भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

Bhagatsingh Koshyari | पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा कोश्यारी यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.

पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कोश्यारी यांनी ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं विधान केलं आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यां यांच्या हस्ते अनेक क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकारांना रेकॉर्डिंग करीत उभे होते. छायाचित्रकारांच्या मागे एक महिला बसली होती. छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली.

त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे?”, यावर सभागृहात हास्यकल्लोळ उठला. पुढे कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.