Bhagatsingh Koshyari | राज्यपाल कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर! शिवाजी महाजारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर चर्चा होण्याची शक्यता

Bhagatsingh Koshyari | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत त्यांनी केलेल्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांनी अशाप्रकारचं विधान केलंय. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल दिल्लीलीत भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची कानउघाडणी करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.