Bhagatsingh Koshyari । “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श, मी नव्या युगाविषयी…”; भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्यं पुन्हा चर्चेत
Bhagatsingh Koshyari । औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली आहे. यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं. हे वाद ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ते म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.”
तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत असून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या या विधानाचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sandipan Bhumre | “अंधारे पैठणमध्ये संध्याकाळी आल्या, त्यांना काय…”, संदीपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर पलटवार
- Best Mileage Bike | ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईक
- Sanjay raut | “…अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- Chitra Wagh | “देशासाठी २ निरुपयोगी जीव”; चित्रा वाघ यांची तुषार गांधी, राहुल गांधींवर टीका
- MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधी यांच्या निषेधार्थ नवी मुंबईत आंदोलन
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.