Bhagwant Mann | राज्यभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी – भगवंत मान
Bhagwant Mann | मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) सध्या भाजपचं वर्चस्व संपवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील जेष्ठ नेत्याच्या गाठीभेटी घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर आज अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी भाजपवर ( BJP) सडकून टीका देखील केली आहे.
मातोश्रीवर या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. तेव्हा भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले, सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आपली लोकशाही धोक्यात आहे. Elected च्या जागी Selected लोक राजकारणात असून आपल्याच मनाचा राज्यपाल निवडायचा आणि बसवायचा, असं सध्या देशात सुरु आहे. तर “राज्यभवन भाजपचं हेडऑफिस बनलं आहे तर भाजपचे ( BJP) नेते अधिकारी आहेत”. अशा शब्दात मान यांनी टीका केली.
Bhagwant Mann Commented On Narendra Modi
दरम्यान, त्यांनी मातोश्रीवर आल्यावर आम्हाला घरी आल्यासारखं वाटतं आहे असं देखील म्हटलं. तसचं 2024 मध्ये भाजपला पुन्हा देशात जिंकून येऊ द्यायचं नाही यामुळे आपण सर्व विरोधीपक्षांनी एकत्र आलं पाहिजे. नाहीतर 2024 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल आणि मग घोषणा करतील की, पुढची 40 वर्षे मीच देशाचा पंतप्रधान राहणार आहे. यामुळे देशाला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. असं भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- MS Dhoni | जगात भारी ‘Thala’ ची एन्ट्री! DJ झेननी सांगितला अवाक करणारा किस्सा
- Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत
- Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार; संजय शिरसाटांचा ठाकरेंवर आरोप
- IPL 2023 | 1 डॉट बॉल 500 झाडं! Tata चा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम
- IPL 2023 | ‘या’ संघांनी खेळले आहे सर्वाधिक IPL Finals
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3BTCUna