InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाग्यश्री मोटे झळकणार थेट बॉलिवूडमध्ये!

- Advertisement -

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या खूपच बीजी आहे. विविध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या भाग्यश्रीकडे सध्या अनेक चित्रपट असून, लवकरच ती एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार आहे.

ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार असून, हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे, हिंदीत नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचा देखील लवकरच समावेश होणार आहे.

- Advertisement -

आगामी वर्षाप्रमाणे यंदाचे वर्षदेखील तिच्यासाठी खूप खास आहे. कारण, यावर्षी सलग तीन मराठी चित्रपटांद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यापैकी ‘पाटील’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले असून, लवकरच तिचा ‘विठ्ठल’ हा सिनेमादेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. यात तिची एक विशिष्ट भूमिका आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.