हाथरसमधील पीडितेच्या आईची गळाभेट घेणाऱ्या प्रियांका गांधींना भाई जगतापांनी दिली वाघिणीची उपमा

हाथरसमधील प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या भेटीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाकडून झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, असं पीडित कुटंबाची भेट घेतल्यानंतर  त्यांनी सांगितलं.

गांधी बंधू भगिनीच्या झंजावातामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या असल्याचं चित्र आहे. जेष्ठ कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रियांका यांची थेट वाघिणी सोबत तुलना केली आहे. कोरोना काळात आई मुलांजवळ जायला घाबरतायत. बलात्कार पीडित मुलीच्या दुःखी आईला छातीशी लावणारी ही वाघीण, इंदिरा गांधींची नात आहे असं म्हणत त्यांनी कौतुकोद्गार काढले.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.