सावरकरांना भारतरत्न हा भगत सिंहांचा अपमान-कन्हैया कुमार

स्वातंत्र्यवीर  सावरकर यांना भारतरत्न देणं हा शहीद भगतसिंह यांचा अपमान आहे. सावकरांना पुरस्कार देणं हा निवडणुकीचा मुद्दा नाही, बेरोजगारी, तरुणांना नोकरी नाही, यावर प्रश्न विचारु नये म्हणू केलेला हा चुनावी जुमला आहे, अशा शब्दात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे कौन्सिल सदस्यचा नेता कन्हैया कुमारने सरकारवर टीका केली आहे. नगर शहर मतदारसंघातील कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार भैरवनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आज कन्हैय्याकुमार अहमदनगरमध्ये आला होता. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैय्या कुमारने भाजपच्या वाचनाम्यावर टीका केली आहे.

सत्ता आल्यावर स्वातंत्र्यवीर सावकर आणि फुले दाम्पत्य यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार, असं आश्वासन भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं आहे. मात्र भाजपच्या या मुद्द्यावर विरोधकांनी टीका केली आहे. निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

या विषयावर विचारलं असता कन्हैया कुमार म्हणाला की, “भाजपने आपल्या वचननाम्या स्वातंत्र्यवीर सवरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र सावरकरांनी इंग्रजांकडे माफीनामा मागितला होता. जर सावरकरांना भारतरत्न दिला तर भगतसिंहांना कधीच भारतरत्न देऊ नये. कारण माफी मागणाऱ्या सावकरांना भारतरत्न दिला तर फाशीवर जाणाऱ्या भगतसिंहांना भारतरत्न देऊन त्यांचा अपमान होईल.”

Loading...

“आम्ही सावरकरांना आम्ही मनात नाही, मानहानीचा दावा केला तरी चालेल. सावरकरांना पुरस्कार देणे हा निवडणुकीचा मुद्दा नाही. बेरोजगारी, बेकारी, तरुणांना नोकरी नाही यावर प्रश्न विचारु नये म्हणून केलेला हा चुनावी जुमला आहे. राम राम म्हणून नथुरामचं राज्य घेऊन आले आणि आता ते इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका कन्हैयाने भाजपवर केली.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.