Bharat Gogawale | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार गट सरकारमध्ये सामील होताच त्यातील नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक आहे की नाही असं वादग्रस्त वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे.
I have 15 years of MLA experience – Bharat Gogawale
भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, “अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी चांगलं काम केलं असलं तरी आम्ही काय वाईट काम करू. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरुष यांच्यामध्ये फरक आहे की नाही. मला आमदारकीचा पंधरा वर्षे अनुभव आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा अनुभव माझ्याकडे आहे.
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, “संजय राऊत यांच्या घरामध्ये निघालेल्या साप त्यांच्या तोंडाला चावायला हवा होता. कारण संजय राऊत खूप जास्त बोलतात. अति तिथे माती हे ठरलेलं असतं.”
“संजय राऊत चुकीचं बोलू नका, असं सांगण्यासाठी तो साप निघाला असेल. त्याचबरोबर त्या सापांनं त्यांना कमी बोलण्याचा इशाराही दिला असेल. माणसानं किती बोलावं यासाठी प्रत्येकाला लिमिट हवं”, असही ते (Bharat Gogawale) यावेळी म्हणाले.
भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये केलेल्या फरकाच्या वक्तव्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळत नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | “बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत मी उद्धव ठाकरेंना हिजडा..”; तृतीयपंथीयांच्या नाराजीवर नितेश राणेंचं स्पष्टीकरण
- Eknath Shinde | खाते वाटपाचा तिढा जाणार केंद्रात! शिंदे,फडणवीस, पवार जाणार दिल्लीत
- Sushma Andhare | वर्षा बंगल्यावर असणार अजित पवारांचं वर्चस्व? सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरात साप निघाल्यावर भरत गोगावले म्हणतात, “अति तेथे माती…”
- Nitesh Rane | नितेश राणेंच्या तोंडाला काळं फसणार; राणेंवर तृतीयपंथी भडकले
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NNoevs