Bharat Jodo Yatra | अखेर प्रतिक्षा संपली! राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आजपासून महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जोरदार तयारी
Bharat Jodo Yatra | मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेने देशातील अनेकांची मनं जिंकली. ही यात्रा कर्नाटक भागात झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जण या यात्रेची वाट बघत असतानाच ही यात्रा आता महाराष्ट्रात होणार आहे. आज 7 नोव्हेंबर पासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल होणार आहेत. तर ही यात्रा ११ दिवसांची असणार आहे. मात्र, या यात्रेत राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांसारखे ज्येष्ठ नेते यामध्ये सहभागी होणार का, असा सवाल उपस्थितआहे. मात्र, काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे.
देगलुर मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होणार असून देगलूर नगर परिषदेतर्फे सत्कार होणार आहे. तसेच यात्रेसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. यात्रेला सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद देखील मिळत आहे. राहुल गांधी हे नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. रोज ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथे सभा आणि कॉर्नर मीटिंग होईल.
नांदेड शहरातील देगलुर नाका येथून पदयात्रेला सुरुवात सुरू होईल, नंतर नवीन मोंढा मैदानावर सभा होईल. या यात्रेमुळे नाव इतिहास निर्माण होणार आहे, जगभरात या यात्रेची दखल घेतली जात आहे.
रोज 24 ते 25 किलोमिटर पदयात्रा राहणार, महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सामील होणार. शिवाय समविचारी पक्षाचे कार्यकर्ते देखील सामील होणार आहेत. दररोज सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात होणार, सायंकाळी 7 वाजेपर्यंत यात्रा संपणार असल्याची माहिती आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यात्रेच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून येणारे नेते, आमदार, पदाधिकारी यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे समन्वयक बाळासाहेब थोरात, मोहन जोशी, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्यामागे भाजपाचं षडयंत्र ?; उदय सामंत म्हणाले…
- Sambhaji Brigade | संभाजी बिग्रेडचा मोठा इशारा; “हर हर महादेव चित्रपट दाखवणं थांबवा, नाहीतर…”
- Narayan Rane | “कुठं काय बोलावं हे त्यांना…”; ऋतुजा लटकेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंची टीका
- Sambhajiraje Chhatrapati | “…तर निर्मात्यांनो गाठ माझ्याशी आहे”; संभाजीराजेंचा मांजरेकरांना इशारा
- T20 World Cup | पाकिस्तान संघातील ‘या’ खेळाडूंच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.