Bhaskar Jadhav। दम असेल तर पाटीवरचं बापाचं नाव काढा, बाळासाहेबांचं नाव लावा; भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान

मुंबई : राज्यातील सत्तांतर नंतर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आज पैठणमध्ये होत आहे. संदीपान भुमरे यांच्यावर या सभेची पूर्ण जबाबदारी आहे. या सभेला मराठवाड्यामधील मोठे दिग्गज नेते तसेच भाजप नेते देखील उपस्थित आहेत. या सभेला होणारी गर्दी ही पैसे देऊन जमवलेली गर्दी असल्याचे आरोप राजकीय वर्तुळातून आरोप होत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मराठवाड्यातून शिंदेसेनेला आव्हान दिलं.

हिंगोलीत आज भास्कर जाधव यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासहित इतर आमदारांवर जोरदार टीका केली. यावेळी भास्कर जाधव म्हणाले कि, 40 गद्दारांनी विश्वासघात केला. बाळासाहेबांच्या विचारांसाठी गद्दारी केल्याचं हे लोक म्हणतायत. पण गद्दारांना माझं आव्हान आहे. तुमच्यात दम असेल तर घराच्या पाटीवरचं तुमच्या बापाचं नाव काढा आणि बाळासाहेबांचं नाव लावा, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.

पुढे यावेळी शिंदेसेनवर टीका करताना भासकर जाधव म्हणाले, तुम्हाला बाळासाहेबांचा आणि शिवसेनेाच स्वाभिमान होता तर मंत्रीपदाची शपथ घेताना तसं का बोलले नाहीत.? उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळेच तुम्ही मागच्या अडीच वर्षात मंत्री झाले. पण हिंदुत्वासाठी नव्हे तर स्वार्थीपणासाठी तुम्ही शिंदे गटात गेले, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.