Bhaskar Jadhav | चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधवांना अश्रू अनावर; म्हणाले…
Bhaskar Jadhav | चिपळून : राणे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेते भास्कर जाधव यांच्यामध्ये गेल्या काही दिवासांपासून आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. दोघांकडून एकमेकांवर खूप टीका केल्या जात आहे. कुडाळमधील भाषणामध्ये जाधवांनी राणे (Rane) कुटुंबीयांवर बेडूक, कोंबडीचोर, चरसी कार्ट अशा शब्दांत टीका केली होती. खालच्या पातळीच्या शब्दांमध्ये टीका होत असल्याने भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काल (शुक्रवार) चिपळूणमध्ये दाखल झालेल्या भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले.
काय म्हणाले भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
प्रसार माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, माझे सर्व सहकारी अशाच प्रकारे माझ्या पाठिशी उभे राहतात. ज्या ज्या वेळेला माझ्यावर आघात होतो, तेव्हा गेल्या 35-40 वर्षांमध्ये सर्वच सहकारी माझ्या पाठिशी उभे राहीले आहेत. नवीन पिढीतले तरुणही माझ्यासोबत आहेत. म्हणून कोणतंही धाडस करताना, निर्णय घेताना मी स्वत:ला एकच विचारतो की आपली भूमिका योग्य आहे की अयोग्य? एकदा मी निर्णय घेतला की त्याच्या दुष्परिणामांची मी परवा करत नाही.
गेल्या अडीच वर्षांपासून भाजपच्या कुवत नसलेल्या, अधिकार नसलेल्या, ज्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलायलाच नको होतं असे, सुसंस्कृत, सभ्य, पार्टी विथ डिफरन्स असं सांगणाऱ्या पक्षातले खालच्या थरातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. त्याच वेळी माझ्या आतला कार्यकर्ता तळमळत होता. कारण मी बाळासाहेबांची शिवसेना पाहिली आहे.
तसेच, जेव्हा शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर आरोप होत होते, तेव्हा आम्हाला अनंत यातना होत होत्या. आमचे ४० सहकारी आम्हाला सोडून गेले आणि या सगळ्याचा कडेलोट झाला. अनेक प्रकारे शिवसेना संपवण्याचा भाजपानं प्रयत्न केला. शिवसेना संपत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि ४० सहकाऱ्यांना फोडून शेवटी त्यांनी शिवसेनेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक आतून धुमसतोय. उद्धव ठाकरे त्याला शांत राहा असं सांगतायत.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | “टिळक म्हणाले होते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आता..”; अरविंद सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला
- Eknath Shinde | “आत्तापर्यंत सगळे दबून बसले होते, मात्र आता…”; मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा
- Sanjay Raut । संजय राऊत यांना दिलासा नाहीच; दसऱ्यानंतर दिवाळीही तुरुंगातच
- T20 World Cup | ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही, सुनील गावस्कर यांनी सांगितले मोठे कारण
- Aravind Sawant । “सध्या ‘चुन चुन के केस दाखिल करेंगे’ असं चालू आहे”; अरविंद सावंतांचा भाजपवर निशाणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.