Bhaskar Jadhav | “त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय”; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका
Bhaskar Jadhav | मुंबई : राज्यात शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून शिंदे गटावर चांगलीच आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांंनी शिंद गटावर सडकून टीका केली आहे.
“मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली, हे देशातलं पहिलं उदा.”- Bhaskar Jadhav
“देशात पहिलं उदाहरण आहे, मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना नेऊन शिवसेना दिली आहे. पण, हा लोकशाहीला मारक निर्णय आहे. संपूर्ण देशाला या निर्णयाचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनीही निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे”, असं आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.
“त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय”
“एखाद्या माणसाची भूक किती असावी. शिवसेना पक्ष आणि निशाणी चोरली आहे. आता अजेंडा सुद्धा चोरायचा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठेने राहिलेल्या आमदारांना निलंबीत करून जर कोणाची भूक भागत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ज्यांची भूक भागत नसते, त्यांना भस्म्या रोग झाला आहे, असं म्हणतात. ज्यांना भस्म्या रोग झाला आहे, त्यांना शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची आहे”, असेही भास्कर जाधव म्हणाले आहेत.
“रामदास कदमांसारखा बेवडा..” (Bhaskar Jadhav Criticize On Ramdas Kadam)
‘योगेश कदम यांच्याविरोधात कट रचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत’, असा आरोप रामदास कदम यांनी केला. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “रामदास कदमांसारखा बेवडा दुसरा काही बोलू शकतो का? त्यांना तेवढीच अक्कल आहे”,असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
राऊतांवर हल्ल्याच्या आरोपाबाबत भास्कर जाधवांचं वक्तव्य
“देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री या नात्याने संजय राऊतांच्या पत्राची गंभीर दखल घेऊन चौकशी करायला हवी होती. पण, त्यांनी त्या पत्राची टिंगल-टवाळी केली आहे. ‘स्टंटबाजी आणि सुरक्षा मिळवण्यासाठी पत्र लिहलं आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत”, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Kapil Sibal | “वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला
- Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया
- Big Breaking | ठाकरेंच्या पदरी निराशा कायम; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायलयाचा नकार
- Sheetal Mhatre | “ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय, हे तरी…”; म्हात्रेंचं खोचक ट्वीट
Comments are closed.