Bhaskar Jadhav | प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई :  शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी नरेंद्र मोदींची नक्कल देखील केली. याप्रकरणी शिवसेना पक्षातील काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव ?

आम्ही केलेल्या भाषणात कोणते चिथावणीखोर वक्तव्य होते, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. मात्र गुन्हा दाखल झाला असेल तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेचे काम करायचे म्हणजे निखाऱ्यावरून चालावे लागते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे निखाऱ्यावरून चालत असताना चटके बसणारच आहेत. आम्हाला फार काही चिंता नसल्याचंही जाधवांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, तेव्हा जे भाषण झाले, त्यामध्ये काय चिथावणीखोरपणा आहे. याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. तरीदेखील त्यांनी असा काही गुन्हा दाखल केला असेल, तर आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. आता महाराष्ट्रात गद्दारीच्या विरोधात जो राग निर्माण झाला आहे. जो आगडोंब उसळला आहे, तो अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून थांबणार नाही.

तसेच, आमच्यातील काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करून हा वणवा विझणार नाही. हा विचारांचा वणवा दिवसागणिक वाढत जाईल. त्यामुळे असे गुन्हे दाखल करताना त्यांनी विचार करणे गरजेचे आहे. आज त्यांच्या बाजूला असलेले लोक उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही-बाही बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात समन्यायी प्रमाणात न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.