Bhaskar Jadhav | प्रदीप कुरुलकर प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…
Bhaskar Jadhav | मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी डी.आर.डी.ओ चे संचालक प्रदीप कुरुलकर ( Pradeep Kurulkar) यांना पुण्यातुन अटक करण्यात आली होती. कारण त्यानी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देशाची गुप्त माहिती दिली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे या प्रकरणे आता अनेक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप ( BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत निशाणा साधला आहे. तसचं त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकिबाबत देखील भाष्य केलं.
दुसऱ्याचं ते कार्टे आणि आपले ते बाळ : भास्कर जाधव
भास्कर जाधव म्हणाले की, प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले असल्ल्याने त्यांच्यावर पटकन कारवाई होत नाही. भाजप फक्त हा सर्व प्रकार बघून गप्प बसला आहे. एकदा व्यक्ती हनी ट्रॅपमध्ये अडतो आणि देशाशी जोडलेली संरक्षण संदर्भातील माहिती बाहेर पाठवतो. त्याला काहीच केलं जातं नाही. परंतु तेच जर परदेशी किंवा कुरेशी यांनी केलं असत तर भाजपचे राष्ट्रीयत्व दिसून आलं असतं. “दुसऱ्याचं ते कार्टे आणि आपले ते बाळ” अशी भाजपची भूमिका आहे. पण आता देशाला त्यांचा खरा चेहरा दिसला आहे. अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.
Bhaskar Jadhav Commented On BJP
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी बैठक घेतली. तिन्ही प्रमुखांनी याबाबत माहिती दिली. परंतु महाविकास आघाडी एकत्र मिळून धोरण सांगत असतात, असं मविआ म्हणते. मात्र, स्वतंत्र मुलाखती वेगळेच काही दर्शवत आहे. असं देखील महाविकास आघाडीवर त्यांनी भाष्य केलं. तसचं जसा कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला आहे तसा महाराष्ट्रात सुधा होईल. शितावरून भाताची परीक्षा घेतली जाते. यामुळे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचंच सरकार सत्तेत येईल, असं देखील भास्कर जाधव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…
- HSC & SSC Results | दहावी-बारावीच्या विद्यार्थांची प्रतिक्षा संपणार! तर ‘या’ दिवशी लागणार निकाल
- Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या ‘या’ सूचना
- Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय ठरलं? अंबादास दानवेंनी दिली माहिती
- Nitin Gadkari | नितीन गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी! नक्की प्रकरण काय?
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WeC91t
Comments are closed.