Bhaskar Jadhav | मुंबई : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘शिंदे गटात सहभागी होण्यासाठी भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना जवळपास 100 फोन केले होते’, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला होता. कंबोज यांच्या या दावानंतर भास्कर जाधवांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्यावर केलेले आरोप कंबोज यांनी सिद्ध केल्यास मी राजकीय जीवनातून मुक्त होईल’, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
भास्कर जाधव आक्रमक (Bhaskar Jadhav Aggressive on Mohit Kamboj)
“मोहित कंबोज हा फडतूस माणूस आहे. त्याने माझ्यावर केलेला एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. भाजपकडे भरमसाठ पैसा आहे. तपास यंत्रणा आहेत आणि सत्तेची मस्तीही आहे. मात्र, मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. तुमच्याकडे असलेल्या तपास यंत्रणा माझ्या मागे लावा, 100 सोडा, जर मी एकनाथ शिंदेंना पाच फोन जरी केले असतील, तर राजकीय जीवनातून मुक्त होईन”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
“मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे”
“मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे, त्या अनाजीपंतांनाही मी सांगतो, तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संपवायला निघाला आहात. पण माझ्यासारखे 100 भास्कर जाधव उभे राहतील. माझ्यावर खोटे आरोप करून तुम्ही माझी कारकीर्द संपवू शकत नाही. कंबोजसारख्या फडतूस माणसाने आरोप केल्यानंतर माझी नाही, तर अनाजीपंतांची प्रतिमा डागाळली जात आहे”, असेही भास्कर जाधव म्हणाले आहेत.
मोहित कंबोज यांचा भास्कर जाधवांवर गंभीर आरोप
कंबोज यांनी सोमवारी एक व्हिडीओ ट्वीट करत भास्कर जाधवांवर गंभीर आरोप केले होते. “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून 2022 मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान 100 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं.”, असं आरोप कंबोज यांनी केला आहे.
खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे !@_BhaskarJadhav की सचाई ! pic.twitter.com/rraB413XC2
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) February 27, 2023
महत्वाच्या बातम्या-
- Shivsena | “हा फक्त पक्षांतर्गत नाराजीचा प्रश्न, पक्षफुटीचा संबंध नाही”; शिंदे गटाचा युक्तीवाद
- Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी
- Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य
- Shivsena | आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचा मोठा युक्तीवाद; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावरुन चर्चा
- #Breaking | काद्यांवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी