Bhaskar Jadhav | “शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत”
Bhaskar Jadhav | मुंबई : काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. अशातच नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून राज्य सरकारवर टीकांचा वर्षाव केला जात आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत, असं म्हणत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच फटकारलं आहे. भास्कर जाधव यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणण्यापूर्वीच नागपूरला होणार टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. हे सरकार आल्यानंतरच मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, भाजपाला यासाठीच महाराष्ट्रात सत्ता हवी होती का?
— Bhaskar Jadhav (@_BhaskarJadhav) October 27, 2022
त्यामध्ये जाधव म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणण्यापूर्वीच नागपूरला होणार टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. हे सरकार आल्यानंतरच मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, भाजपाला यासाठीच महाराष्ट्रात सत्ता हवी होती का?” तसेच, C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प तब्बल 22 हजार कोटींचा असल्याचं समजतं आहे. या प्रकल्पाचे 30 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, टाटा एअर प्रकल्पावरून शिवसेनेच्या फेसबुक आकाऊंटवरून पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला होता. त्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, “गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?.”
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | टाटा एअरबस प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…
- Uddhav Thackeray | ‘पाकिस्तानविरुद्धचा सामना आपण जिंकलो कारण…’, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- Sachin Sawant । जितका काळ शिंदे-फडणवीस सरकार राहील, तितका महाराष्ट्र कंगाल होईल; काँग्रेसचा दावा
- Supriya Sule | ‘टाटाएअर बस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Saamana | सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला हल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.