Bhaskar Jadhav | “सरकारने दिलेली दिवाळी भेट केवळ गरीब शेतकऱ्यांची केलेली चेष्टा”, भास्कर जाधव संतापले

Bhaskar Jadhav | मुंबई : परतिच्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सध्या त्रस्त आहेत. अलिकडेच एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी देखील समोर आली होती. काही मंत्र्यांनी आनंदाचा शिडा (Anandacha Shida) वाटप केला. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

अतिवृष्टी, परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानानं शेतकरी नाडला गेला आहे, असे असताना शंभर रुपयात या सरकारने दिलेली दिवाळी भेट केवळ गरीब शेतकऱ्यांची केलेली चेष्टा आहे, असा टोला भास्कर जाधवांनी लगावला आहे. शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या दु:खावर डागणी दिली आहे. काही मंत्री स्वत: आनंदाचा शिधा वाटप करत होते. ते माझ्या मतदारसंघात १ लाख रेशन कार्ड असल्याचं म्हणत होते. एक लाख रेशनिंग कार्ड असणं आश्चर्यकारक असल्याचं वाटतं आहे, असं देखील ते म्हणाले.

पाण्यामुळे शेतकरी कुजून जात आहे. अशावेळी सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाजा केला. ते आपली पाठ आपणच थोपटून घेत आहेत असं म्हणत आनंदचा शिधा पॅकेट्सवर स्वतःचे फोटो लावण्यावरुन देखील भास्कर जाधवांनी टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.