Bhaskar Jadhav । संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; म्हणाले…

(Bhaskar Jadhav) सिंधुदूर्ग : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद सुरु असतानाच दुसरीकडे मात्र विरोधीपक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांपैकी एक असणाऱ्या भास्कर जाधवांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची नक्कल करत त्यांना डिवचलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद दिलं त्याच भाजपने पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या कारणावरून संजय राठोड यांच्यावर सातत्याने टीका केली होती. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टीव्हीसमोर यायच्या त्या प्रकरणावर बोलायच्या. ‘उद्धव ठाकरे साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायाची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या’, असं म्हणायच्या मग आज चित्रा वाघ कुठे आहेत? असा खोचक सवाल जाधव यांनी केला.

आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्येच संजय राठोड यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”, असा टोला भास्कर जाधव यांनी चित्र वाघ यांना लगावला आहे. “त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला. ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली. त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशा पद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली गेली.

ज्या संजय राठोडांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला त्यांनाच आज भाजपाचं सरकार येण्यासाठी सन्मानाने मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळाला,” असं भास्कर जाधव म्हंटले आहेत. भास्कर जाधव यांच्या या टीकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या या टीकेला चित्र वाघ काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.