Bhaskar Jadhav | 25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो लावणाऱ्याचं भास्कर जाधवांकडून कौतुक, म्हणाले…

मुंबई : सध्या देशामध्ये सगळीकडे भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा, यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा लावावा, अशी मागणी केली. यावर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.अशातच सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीने 25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणे (Narayan Rane) यांचा फोटो संपादित केला. तसेच ‘हे नाणं फायनल करा’ अशी मागणी त्याने केली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)

संबंधित फोटो संपादित (एडिट) करणाऱ्या व्यक्तीचं भास्कर जाधव यांनी कौतुक केलं आहे. ज्याला कुणाला ही कल्पना सुचली असेल, त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे,असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. जाधवांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

भास्कर जाधव यांना नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावल्याबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “नोटांवर विविध नेत्यांचे फोटो असावेत, ही चर्चा मी ऐकली आहे. ज्याला कुणाला ही कल्पना सुचली असेल, त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, एवढंच मी याबद्दल बोलेल.”

दरम्यान, विविध राजकीय नेत्यांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली. यामध्ये काहींनी देवदेवतांची नावं सूचवली तर काहींनीराजकीय नेत्यांचीही नावे सूचवली. संबंधित महापुरुषांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अशा विविध नेत्यांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.