“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

मुंबई : रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, असे नेटकरी त्यांना सुनावत आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवुन द्यायचं आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.

भाजपकडून भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणावर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे. भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. त्यांनी आधी विधानसभेत गैरवर्तन केलं होतं, आता जाहीर कार्यक्रमात केलं, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा