मुलं नसणाऱ्या स्त्रियांबाबत बोलताना पुन्हा भिडे गुरुजींचा तोल सुटला

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी थेट गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

संभाजी भिडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ‘वर्षा’वर

मुलं नसणाऱ्या स्त्रियांचा आक्षेपार्ह शब्द वापरत भिडे यांनी उल्लेख केला आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘….तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करावा’

सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये भिडे नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांना गरोदर स्त्रियांचा अपमान करणारे वक्तव्य केले. “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे,” असं भिडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.