Bholaa Teaser Release | अजय देवगनच्या ‘भोला’ या चित्रपटाचा धमाकेदार टिझर रिलीज

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgan) चा दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस (Box Office) वर घालत आहे. हा चित्रपट सध्या नवे विक्रम रचनेमध्ये व्यस्त आहे. अशात अजय देवगनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘भोला’ (Bholaa) चा टीझर रिलीज झाला आहे. थ्रीडीमध्ये रिलीज होणाऱ्या भोला या चित्रपटाचा टीझर सध्या धुमाकूळ घालत आहे.

‘भोला’ (Bholaa) चा टीझर रिलीज

अजय देवगनने सोमवारी भोलाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या टीझरची घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांना  भोलाच्या टीझरची उत्सुकता लागली होती. दरम्यान, अजय देवगनने मंगळवारी सकाळी भोलाचे लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलरवर भोलाचा लेटेस्ट टीझर देखील शेअर केला आहे. भोलाच्या टीझरच्या सुरुवातीला एक ज्योती नावाची मुलगी अनाथ आश्रमात दिसत आहे जिला कोणीतरी घेऊन जाणार आहे.

त्यानंतर टीझरमध्ये अजय देवगन तुरुंगामध्ये उपस्थित दाखवला आहे. तुरुंगामध्ये तो भगवद्गीता वाचताना दिसत आहे. त्याचबरोबर टीझरच्या शेवटी अजय देवगन ॲक्शन सिक्वेन्समध्ये दिसत आहे. भोलाच्या या टीझर वरून असे लक्षात येते की, अजय देवगनचा हा चित्रपट धमाकेदार ॲक्शन चित्रपट असेल.

भोलाच्या टिझरनंतर चाहत्यांना आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट नुसार, हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित केला जाऊ शकतो. भोला हा चित्रपट  साऊथ चित्रपट ‘कैथी’चा अधिकृत हिंदी रिमेक असून अजय देवगणनेच त्याचे दिग्दर्शन केले असल्याची माहिती आहे. या चित्रपटांमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगन शिवाय अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.