Bhupendra Patel | गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नेमके आहेत तरी कोण?; वाचा सविस्तर
Bhupendra Patel | महाराष्ट्र देशा : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जसजसा हाती येत आहे त्यातून हे स्पष्ट झालं आहे कि भाजपने या वेळीही बाजी मारलेली आहे. अशातच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषणा केली आहे. गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी सांगितलं आहे.
गांधीनगर येथे १२ डिसेंबर रोजी विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात शपथविधी होणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
मात्र सलग दोनदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) नेमके कोण आहेत? त्यांच्या राजकीय प्रवास कसा आहे? हे तुम्हाला माहित आहे का?
२०१७ मध्ये पहिल्यांदा आमदार…
भूपेंद्र पटेल हे 2017 साली गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे विश्वासू समजले जातात. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. या मतदारसंघातून पूर्वी आनंदीबेन पटेल निवडून येत असत. तब्बल एक लाख 17 हजार मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते. काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता. भूपेंद्र पटेल हे यापूर्वी अहमदाबाद महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
भूपेंद्र पटेल यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. राजकारणात पूर्णपणे प्रवेश करण्याअगोदर ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण (एयूडीए)चे अध्यक्ष देखील होते. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपद सोडलं, तेव्हा त्यांनी अपल्या जागेवरून भूपेंद्र पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “गुजरात निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत हे दाखवलं” ; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Rohit Pawar on Gujarat Result | “मोठ्या मनाने स्वतःचे प्रकल्प गुजरातला…” ; गुजरात निकालांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
- Devendra Fadnavis | भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास उभा केला – देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadnavis | “सत्यजित तांबे यांना संधी द्या, नाहीतर…” ; बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांचा टोला
- Sanjay Raut | दिल्लीसाठी आपं आणि भाजपमध्ये साटंलोटं – संजय राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.