भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

अहमदाबाद : देशाच्या राजकीय वर्तुळातील मोठी घटना गेल्या दोन दिवसांपूर्वी घडली. याघटनेचे सर्वांकडूनच आश्यर्य व्यक्त केलं जातंय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

यानंतर आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना धक्का देत एका दुसऱ्याच नावाची निवड करण्यात आली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

आनंदीबेन पटेल आणि पंतप्रधान मोदी यांचे जवळचे सहकारी म्हणून भूपेंद्र पटेल यांची ओळख आहे. अहमदाबादमधील घाटलोहिया या मतदार संघाचे आमदार आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते.

मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याआधी देखील ऑगस्ट २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल त्यांची जागा घेतील, अशी चर्चा होती. मात्र तेव्हा देखील त्यांच्याऐवजी रुपाणी यांची निवड करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा