Bhuvneshwar Kumar | BCCI चा मोठा निर्णय! भुवनेश्वर कुमारची कसोटीनंतर ODI कारकीर्द संपली?

Bhuvneshwar Kumar | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची वनडे कारकीर्द संपल्याचं दिसत आहे. कारण गेल्या अनेक मालिकांपासून त्याला संघात संधी मिळालेली नाही. न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि आत्ता होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय संघात त्याला स्थान मिळाले नाही. अशात कसोटीनंतर भुवनेश्वरची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द संपणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Bhuvneshwar Kumar played his last T20 match in November 2022

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याची कसोटी कारकीर्द संपली आहे. त्याचबरोबर तो आता एकदिवसीय क्रिकेटपासून देखील लांब जाणार असल्याचं बोललं जात आहे. भुनेश्वरनं जानेवारी 2022 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर नोव्हेंबर 2022 मध्ये त्यानं शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले आहे. मात्र, भुनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ला टी-20, कसोटी, एकदिवसीय कोणत्याही संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळं आता त्यांचं पुनरागमन होणं अशक्य वाटत आहे.

दरम्यान, गेल्या काही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) चांगली कामगिरी करू शकला नाही. त्या सामन्यांमध्ये बहुतेक तो भारतीय संघाच्या पराभवाचे कारण ठरला आहे. त्यामुळं कदाचित बीसीसीआयनं (BCCI) त्याला कोणत्याच संघात घेतलं नाही.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CNGxeU