भाजपला मोठा झटका ; ममतादीदींचा पुन्हा ‘खेला’, मुकुल रॉय यांची घरवापसी?

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे मोठे नेते मुकुल रॉय यांची पुन्हा घरवापसी होणार असून त्यांनी टीएमसीमध्ये परतण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मुकुल रॉय टीएमसी जॉइनबाबत निर्णय आज घेऊ शकतात. त्यांची आज दुपारी तीन वाजता कोलकात्यात टीएमसी अध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठक होणार आहे, त्यानंतर ते पक्षात प्रवेश करण्याबाबतचा निर्णय घेतील. या बैठकीत अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित असतील असे सांगितले जात आहे.

यापूर्वी बुधवारी टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनीही मुकुल रॉय यांच्या पार्टीत सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. यावेळी त्यांनी मुकुल रॉय यांचे कौतुक करत असे म्हटले की, त्यांनी टीएमसी पक्ष सोडला असला तरी त्यांनी कधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरूद्ध उघडपणे कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा कोणताही आरोप केला नाही.

सौगत रॉय यांच्या या वक्तव्यानंतर या शक्यतांना अधिक बळ मिळालं असून, त्यात मुकुल रॉय भाजपा सोडून टीएमसीमध्ये जात असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुल रॉय केवळ ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये परत येऊ शकतात. टीएमसीमध्ये मुकुल रॉय यांची घरवापसी म्हणजे भाजपाला धक्कादायक ठरणार असून हा निर्णय बंगालमधील त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा