Big Boss Marathi | बिग बॉस मराठी 4 मध्ये अमृता फडणवीसांची एन्ट्री

टीम महाराष्ट्र देशा: ‘ऑल इज वेल’ या थीमसह टीव्हीवर बिग बॉस मराठी 4 Big Boss Marathi 4 धुमाकूळ घालत आहे. बिग बॉसच्या या सीजन मध्ये सुद्धा पहिल्या दिवसापासूनच वादविवाद, भांडण, प्रेम, गप्पा इत्यादी गोष्टी बघायला मिळत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात सुरू आहे. दिवाळीची धूम सुरू असताना सदस्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी अमृता फडणवीस बिग बॉस मराठी च्या घरात प्रवेश करत आहेत.

अमृता फडणवीस यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करत दिवाळी सण साजरा केला आहे. घरामध्ये प्रवेश करतात अमृता फडणवीस यांनी ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करून घरच्यांचा उत्साह अजून वाढवला. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अमृता फडणवीस यांनी उत्तरे देखील दिली.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमो मध्ये अमृता फडणवीस बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करताना. यावेळी त्या घरातील सदस्यांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या बिग बॉस हा एक खूप सुंदर शो आहे आणि मला तो सोडायचा नाही. अमृता फडणवीस बिग बॉस मराठीच्या या घरातल्या सदस्यांसमोर एन्जॉय करताना दिसत आहे.

त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर बिग बॉस घरातील प्रवेशाबद्दल एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अमृता फडणवीस यांची पोस्ट :
काल रात्री Big Boss मराठी च्या घरी हजेरी लावुन दिवाळीच्या शुभेच्छा देतांना आणि स्पर्धकांसोबत धमाल करतांना खुप मज्जा आली.
आजच्या भागात सुद्धा बघा तूफान फटकेबाजी – रात्री १० वाजता फक्त Colors Marathi वर !
#bigbossmarathi4

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.