Big Breaking | अमित शहांसोबत शिंदे-फडणवीसांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर आजच शिक्कामोर्तब?

Big Breaking | नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने सध्याची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी हाती येऊ शकते, अशी माहिती सध्या समोर आली आहे.

राज्यातील सहकार क्षेत्रासंबंधीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासंबंधी रणनीती आज ठरवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी साखर उद्योगातील महत्त्वाचे भाजप नेते दिल्लीत उपस्थित आहेत. दुपारी 4 वाजता अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिंदे गटाचे मंत्रिपदासाठी इच्छुक

राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपमधील आमदारांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेल्या इच्छुकांचे डोळे आता दिल्लीच्या दिशेने लागले आहेत.

शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा समावेश आहे. मंत्रिपदाचं आश्वासन मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडूही खातेवाटपाच्या प्रतिक्षेत आहेत.

भाजपमधून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा असल्याची चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.