Big Breaking | केंद्राची नामांतराला परवानगी; औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ अन्…
Big Breaking | मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो.
हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती. मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगाबाद याने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात येत होती. आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Eknath Shinde | “आमच्यावर कृष्णकाठी प्रायश्चित घेण्याची वेळ कधी आली नाही”; मुख्यमंत्र्यांची अजित पवारांना कोपरखळी
- Ajit Pawar | “मंत्री गुंडांना सोबत घेऊन फिरतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर जहरी टीका
- Uddhav Thackeray | ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग; भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती
- Eknath Shinde | ‘आले रे आले गद्दार आले’; पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत घोषणाबाजी
- Shahaji Bapu Patil | “संजय राऊतांचं आडनाव आगलावे करा”; शहाजी बापू पाटलांची बोचरी टीका
Comments are closed.