कोरोनावरील लसीबाबत ‘या’ बड्या कॉँग्रेस नेत्याचा सवाल

भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. पण आता ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात कोव्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायल (मानवी चाचणीसाठी) परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस आहे.

जामखेडच्या सभापतीपदासाठी रोहित पवार व राम शिंदे यांच्यात चुरस

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने जारी केलेल्या पत्रानुसार, या लसीचा मानवावरील प्रयोग 7 जुलै या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. या नंतर जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्यदिनी ही लस लॉन्च केली जाईल. या पूर्वीत ही लस बाजारात उपलब्ध होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टिका केली आहे.

बापरे ! जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पार केला तब्बल एक कोटीचा टप्पा

पृथ्वीराज चव्हाण एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, कोरोनाचं संकट मोठं आहे. तसेच त्याबाबत कोणालाच अंदाज नाही. त्यातच भारत बायोटेक आणि आयसीएमआर 15 ऑगस्टला लस बाजारात आणणार असं सांगितलं जात आहे. मात्र यावर मला आश्चर्य वाटत आहे. हे नेमकं कसं होणार, धोरण काय असणार असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.