राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात
मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने खासगी शाळांच्या फी संदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. कोरोनाकाळात केलेली फी वाढ रद्द करावी तसेच राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. यापार्श्वभूमीवर आज मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासगी शाळांचे 15 टक्के शुल्क माफीबद्दलचे अध्यादेश राज्य सरकारकडून लवकरच काढण्यात येतील. खासगी शाळांनी किती फी आकारावी हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र, कोरोनामुळे फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशामध्ये प्रस्तावित आहे.
दरम्यान, कोरोनाकाळात झालेल्या फी वाढीसंदर्भात महाराष्ट्रातील काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करताना 22 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फी संदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. तसेच येत्या तीन आठवड्यांमध्ये यावर निर्णय घेत आदेश द्यावेत, असं देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आता राज्य सरकारचा हा निर्णय पालकांना दिलासा देणारा ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी काय राज कुंद्रा आहे का?’; पुण्यात राज ठाकरेंचा अनोखा अंदाज
- ‘ए तु थांब रे! मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना भरला दम
- देवेंद्र फडणवीसांचं ‘या’ कारणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तातडीचं पत्र!
- ‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- “…यामुळे भारतीय व्यक्तींचं स्वीस बँकेमधील गौडबंगाल कधीच उघडीस येणार नाही”