मोठी बातमी ; तब्बल १२७ कोटींचा घोटाळा आणि २७०० पानी पुरावे; मंत्री मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचे आरोप

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. आज त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत.

मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं . तसेच , फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले. किरीट सोमय्या म्हणाले की मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे.

हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, सेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा