मोठी बातमी : चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळीबार, सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू 

मुंबई : हॉलिवूड चित्रपट ‘रस्ट’च्या सेटवर चुकून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुकून झालेल्या या गोळीबारात एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आहे, तर एक दिग्दर्शक गंभीररित्या जखमी झाला आहे. गुरुवारी २१ ऑक्टोबरदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्डविनच्या आगामी ‘रस्ट’ सिनेमाचे शूटिंग सुरु होते. यावेळी एका सीन शूटमध्ये बंदूकीचा वापर केला जात होता. अचानक अभिनेता एलेक बाल्डविनच्या हातातील एका प्रॉप बंदूकीतून गोळी सुटली आणि ती थेट सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स यांना जाऊन लागली. या गोळीबारात ४२ वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स हीचा मृत्यू झाला. तर दिग्दर्शक जोएल सुजा (४८) गंभीर जखमी झाले आहेत.

यातील धक्कादायक बाब म्हणजे खऱ्याखुऱ्या बंदुकीचा वापर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान केला जात होता. त्यामुळे सिने जगतात एकचं खळबळ माजली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. ही प्रॉप गन नेमकी कशी होती? यात कोणत्या प्रकारचा दारुगोळा वापरला होता याचा पोलीस तपास सुरु आहे.

मात्र या घटनेमुळे केवळ हॉलिवूडचं नाही तर बॉलिवूडकडून देखील हळहळ व्यक्त होतेय. सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स ही एक हॉलिवूड विश्वातील नवोदित सितारा होती.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा