मोठी बातमी : कोरोनामुळे अभिनेता सुनील शेट्टी यांची इमारत सील

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची कोरोनामुळे राहती इमारत मुंबई महानगरपालिकेनं सील केली आहे. मिळालेल्या माहितानुसार सुनील शेट्टीच्या ईमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील अल्मोउन्ट रोड येथील पृथ्वी अपार्टमेंट सील करण्यात आलं आहे.

याबद्दल मुंबईच्या डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी माहिती दिली आहे. “पृथ्वी अपार्टमेंट सील करण्यात आली आहे. या भागात सध्या अशा १० इमारती सील आहेत. यामध्ये मलबार हिल्स आणि पेडर रोड वरील इमारतींचा देखील समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उंचावरील जागांवर 80 टक्के रुग्ण आढळले होते.”असे ते म्हंटले

सुनिल शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या मुंबईबाहेर आहेत. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व रहिवास्यांची आता कोरोना टेस्ट करण्यात आली. तोपर्यंत सर्व जण सेल्फ क्वारंटिनमध्येच राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा