मोठी बातमी : अखेर आर्यन खानला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई : कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना अटक केली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्र स्थानीं आहे. यानंतर राजकीय आणि बॉलिवूड मधून आर्यन खानच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यानंतर गेल्या तीन वेळेस आर्यन खानचा जमीन अर्ज फेटाळल्याने आज पुन्हा आर्यन खानच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील होत. २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला.

सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय.आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा