मोठी बातमी : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

विधानसभेचे आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणाऱ्या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

अखेर देशद्रोही शरजील इमामला अटक !

मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोनाचा केंद्रबिंदू बनलं आहे. पिंपरी चिंचवड येथे दररोज १५० ते २०० च्या आसपास कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बैठकिला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते. त्यांनी मतदार संघातील कोरोनाच्या परिस्थितीवर मान्यवरांसोबत चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री यांनी देखील घेतलेल्या बैठकिला ते उपस्थित होते. यावेळी त्यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.