मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षा वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग लक्षात घेता पुढे ढकलण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संबंधीची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात बैठक पार पडल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत लेखी स्वरूपात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे आणि ऑनलाइन माध्यमातून परीक्षा घेतल्या तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्कमुळे त्यापासून वंचित राहावं लागेल. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भातील मागणीने जोर धरला होता. याचा विचार करून आता दहावीची परीक्षा जून-2021 मध्ये घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा मे-2021 च्या अखेरीस घेण्याचं नियोजन करण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा