मोठी बातमी : भाजपचा मेगा प्लान; मुख्यमंत्री बदलानंतर आता संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती.यानंतर आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना धक्का देत एका दुसऱ्याच नावाची निवड करण्यात आली आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

यानंतर आता मुख्यमंत्री बदलले तरी पक्षांतर्गत नाराजी कायम असून, मंत्रिमंडळावरून आता वाद सुरू झाला आहे. यामुळे आज दुपारी होणारा मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तिकडे नाराज आमदार विजय रुपाणींच्या घरी जमा झाले आहेत. कारण, नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या विचारात आहेत, ज्यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळातून ९० टक्के जुन्या चेहऱ्यांना हटवलं जाईल आणि त्याजागी नवे चेहऱ्यांना संधी दिली जाईल. या सर्व शक्यतेनंतर आता भाजपच्या जुन्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी नाराज नेते पोहचण्यास सुरूवात झाली आहे. या नाराज नेत्यांमध्ये ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बचु खाबड, वासण आहीर, योगेश पटेल यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा