मोठी बातमी : प्रकृती खालावल्याने एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती समोर आली आहे .

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा