मोठी बातमी : प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी खान आणि त्यांच्या कुटूंबियांनी गेल्या आठवड्यात नेताजी नगरमध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना खान यांनी सांगितले की, माझ्या मुलीनं त्या आरोपींच्या संबंधी माहिती जमवण्यास मदत केली. तिनचं सांगितलं की, ते आमचे पूर्वीचे चालक आणि सहायक आहेत. त्यांनी मला स्नायपर आणि ड्रोनच्या साह्यानं हल्ला करण्याची धमकी दिली होती.

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हा उस्ताद राशिद खान यांच्याकडे काम करणारा कर्मचारी आहे. त्याला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीला कोलकातामधून अटक करण्यात आली आहे. तो खान यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला होता. पोलिसांनी सांगितलं की, या आरोपींनी राशिद खान यांच्याकडे सेफ्टीसाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी ती रक्कम कमी करत 20 लाख रुपये केली. खान यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा