मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

मुंबई : कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना अटक केली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्र स्थानीं आहे. यानंतर राजकीय आणि बॉलिवूड मधून आर्यन खानच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यानंतर गेल्या तीन वेळेस आर्यन खानचा जमीन अर्ज फेटाळल्याने आज पुन्हा आर्यन खानच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील होत. २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना आज अखेर दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मनीश राजगरिया आणि आविन साहू या दोघा आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिलेच आरोपी आहेत. यातील एक सहआरोपी मनिष राजगरियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजगरियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. आर्यन खानच्या जामिनासाठी एनसीबीने विरोध केला आहे. आता जर जामीन मिळाला तर याचा थेट परिणाम पुढील तपासावर होईल असा दावा एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे. तसेच आर्यन खानला उद्या जामीन होतो का? याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे.

हत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा